Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पाईपलाईनच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल!

क्राईम

पाईपलाईनच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 2, 2026Updated:November 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पारोळा प्रतिनिधी | शेतातील पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना पारोळा तालुक्यातील भोकरीबारी शिवारात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल गणपत पाटील (वय ३२, रा. भोकरीबारी, ता. पारोळा) हे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात असताना ही घटना घडली. त्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून संजय भिवसन पाटील, गोपाल संजय पाटील आणि प्रशांत उर्फ लाला संजय पाटील (सर्व रा. भोकरीबारी) यांनी त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपींनी विठ्ठल पाटील यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ नोव्हेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला त्यावेळी आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ. शरद पाटील करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जावयाकडून सासऱ्याला मारहाण: एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 2, 2026

वरणगावात गोळीबाराचा थरार! २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हल्लेखोर फरार, शहरात खळबळ

November 1, 2026

नांद्रीत वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा खून; चौघांविरुद्ध गुन्हा, चालकाला अटक, तिघे फरार!

November 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add