Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रावेर शहरात ९ दुचाकी हस्तगत चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या;

ताज्या बातम्या

रावेर शहरात ९ दुचाकी हस्तगत चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या;

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पोलिसांनी कोरपावली येथील त्यांच्या घरून त्यांना अटक केली.

रावेर शहरातील दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी कोरपावली येथून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना रावेर शहरातील चक्क ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गौरव दत्तात्रय तायडे (२०), तौसिफ तैय्यब आणि अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (तिन्ही रा. कोरपावली, ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातील सराफा व्यावसायिकांची दुचाकी रावेर शहरातील स्वामी नारायण मंदिरजवळून चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी ही चोरीची दुचाकी शिरपूर येथे विकून चोरटे चोपडा येथे पोहचल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यानंतर रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकाने चोपड्यात तपास केला असता हे तीनही संशयित कोरपावलीकडे पळाले. पोलिसांनी कोरपावली येथील त्यांच्या घरून त्यांना अटक केली.

या पथकात पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, रूबाब तडवी, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, गजानन बोने यांचा समावेश होता. या तीनही संशयितांना रावेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चोरीच्या दुचाकींच्या विक्रीसाठी बोगस आरसी बुक बनवून देणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add