
बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल
मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या मागील बाजूने दहा ते पंधरा जणांनी प्रवेश करत खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या तसेच लोखंडी गेटची तोडफोड केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


