Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»डंपर थेट घरावर उलटला : २ महिलांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

डंपर थेट घरावर उलटला : २ महिलांचा जागीच मृत्यू

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रिंग रोडच्या कामादरम्यान दुर्दैवी घटनेचा थरार

डंपर घरावर पलटल्याने घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला असल्याची भीषण दुर्घटना पुण्यातील मुळशीत रिंग रोड कामादरम्यान घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.

मिळालेली माहितीनुसार, मुळशी तालुक्यात रिंग रोडचे रस्त्याच्या भरावाचे काम सुरू होते. यादरम्यान डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. तसेच प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना मदत आणि नुकसानभरपाईबाबत मागणी करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add