Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»एका रात्रीत दोन वाइन शॉप फोडले; लाखो रुपये लंपास, एकाला अटक

ताज्या बातम्या

एका रात्रीत दोन वाइन शॉप फोडले; लाखो रुपये लंपास, एकाला अटक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी,

जळगाव । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच शहरातील दोन वाइन शॉपची शटर फोडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत सराईत आरोपी रामनिवास मंजू गुप्ता (३७, रा. कल्याण, जि. ठाणे) याला अटक करून त्याच्याकडून रोख २ लाख ४ हजार रुपये व दुचाकी हस्तगत केली आहे.

याबाबत असे की, भजेगल्लीतील विजय चौधरी यांच्या मालकीच्या प्रिन्स वाइनशॉपच्या शटरच्या कड्या कापून चोरट्याने २ लाख ५० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी व्यवस्थापक श्रीराम रामचंद्र भोई यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तर अजिंठा चौफुलीजवळील राज वाइन शॉपच्या शटरच्या कड्या तोडून १ लाख २५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी व्यवस्थापक राजेंद्र युवराज सोनवणे (३३) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

एकाच रात्री दोन वाइन शॉपमध्ये चोरी झाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दोन्ही ठिकाणी चोरी करणारा एकच असल्याची खात्री झाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरट्याचा शोध घेत रामनिवास गुप्ता याला अटक केली.

गुप्ता हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध सानपाडा, नेरूळ, ठाणे शहर, काशीमीरा, मीरा-भाईंदर, नालासोपारा, कोरेगाव पार्क पुणे, जिल्हापेठ, एमआयडीसी याठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो १५ दिवसांपूर्वी तळोदा कारागृहातून बाहेर आला होता. चोरी करण्यासाठी दुचाकीने जळगावात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add