Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या युवकाचं धक्कादायक पाऊल

ताज्या बातम्या

शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या युवकाचं धक्कादायक पाऊल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

जळगाव । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिक्षण करण्यासाठी हॉटेलवर वेटर म्हणून कामाला असलेल्या तरुणाने राहत्या खोलीमध्ये जीवनयात्रा संपविली. प्रवीण तुलसीदास राठोड (वय १९, रा. आदर्श नगर) असं मयत तरुणाचं नाव असून तो बारावीचे पेपर देत होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धानवड येथील रहिवासी असलेला प्रवीण राठोड हा तरुण जळगावात हॉटेलवर कामाला होता. वडील बारलेले असल्याने पुढील शिक्षणासाठी तो वेटरचे काम करीत होता. तो बारावीचे पेपर देत होता. हॉटेलमालकाच्या आदर्श नगरातील घरात भाडे तत्वावर सोबत काम करणार्या घेऊन या तरुणासह राहत होता. १९ रोजी रुममधील तरुण बाहेर गेलेले असताना प्रवीणने गळ#$ फास घेतला. काही वेळानंतर इतर तरुण घरी आले असता आतून दरवाजाला लावलेला होता.

त्यामुळे त्यांनी प्रवीणला कॉल केला; मात्र तो कॉल घेत नव्हता. त्यामुळे तरुणांनी गॅलरीतून उडी घेत घरात गेले असता प्रवीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला जीएमसी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add