Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ वधू-वर विवाहबंधनात

जळगाव

अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ वधू-वर विवाहबंधनात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता.

अखिल भारतीय लेवा पाटील संघाच्यावतीने लेवा पाटीदार समाजाच्या रविवार, २२ फेब्रुवारी रोजी मिराई लॉन, जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता. सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १९ वधू-वरांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

कार्यक्रमाची सुरुवात मंगलाष्टक व वेदघोषाने झाली. सर्व विवाहविधी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या १० बैलगाड्यांनी दिमाखात आणि शिस्तबद्धरित्या पार पाडण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक यांचा सत्कार देखील करण्यात आला. समाजबांधव, नातेवाईक व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख स्वागत अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी नवदांपत्यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामूहिक विवाहामुळे अनावश्यक खर्च टळतो तसेच समाजात एकात्मता, साधेपणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जातो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. मान्यवर खा. रक्षा खडसे, महापौर दीपमाला काळे, हभप भरत महाराज, धनंजय चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, रेखा पाटील, माजी महापौर सीमा भोळे, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, योगेश पाटील, नगरसेविका सिंधु कोल्हे, जयश्री महाजन, माजी जि.प. अध्यक्ष लालचंद पाटील, यावल गटनेत्या मंदा महाजन, ललित चौधरी, मनीषा खडके, पियुष कोल्हे, पो.पा. प्रभाकर पाटील, तुषार महाजन, चंदन अत्तरदे, मिलिंद चौधरी, गायत्री राणे , प्रवीण कोल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अखिल भारतीय लेव पाटीदार युवक महासंघ केंद्रीयध्यक्ष प्रकाशराव पाटील, प्रदीप भोळे, अध्यक्ष लेव पाटीदार महामंडळ मधुकर भंगाळे, प्रदीप रोटे, अविनाश भोळे, महेश चौधरी, देवा वाणी, सुरेश फालक, सागर चौधरी, शुभम पाटील, अतुल महाजन, अरविंद किनगे यांच्यासह बहिणाबाई ब्रिगेड जळगाव प्रदेशाध्यक्ष आशा कोल्हे, हर्षा बोरोले, सुनीता येवले, वैशाली झोपे, वंदना नेमाडे, भावना भोळे, डिंपल पाटील, रेणुका झांबरे, संध्या महाजन, अंजलीताई नारखेडे, स्वाती भोळे, मनीषा पाटील, नयना जावळे, कल्पना शिंदे, वैशाली पाटील, मेघा कुरकुरे, दीप्ती चौधरी, मेघा वाणी ,सोनल महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनिता येवले यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add