Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जपान येथे आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

ताज्या बातम्या

जपान येथे आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला.

जळगाव | जपान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा आणि देशाचा मान उंचावला. या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कारप्रसंगी खडसे यांनी खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील आशिष जगताप (बीड), शरद बढे (धाराशिव), प्रथमेश अलिबागकर (पुणे), विनायक सपकाळे (जळगाव) आणि प्रथमेश गायकवाड (पुणे) या पाच खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या खेळातील कौशल्य, संघभावना आणि चिकाटीमुळे भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कामगिरी करता आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे सचिव, शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे (अमरावती), उपाध्यक्ष राजेश जाधव (जळगाव), सहसचिव कैलास करवंदे (बुलढाणा) तसेच जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, कार्याध्यक्ष गिरीश पाटील, सहसचिव सचिन महाजन आणि सल्लागार अनिल चव्हाण उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करत भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. डॉजबॉलसारख्या खेळाला ग्रामीण आणि शालेय स्तरावर अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राज्यातील तरुणांनी खेळाकडे करिअरच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या सत्कारामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add