Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये अखेर आक्रमक माकड जेरबंद;

ताज्या बातम्या

भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये अखेर आक्रमक माकड जेरबंद;

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महिनाभराच्या दहशतीनंतर ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास…!

भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या महिनाभरापासून एका बिथरलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाच्या हल्ल्यात सुमारे ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले होते. अखेर वनविभागाच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित माकडाला जेरबंद करून जंगलात सोडले.

माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी माकडांची एक टोळी गावात आली होती. त्यातील इतर माकडे निघून गेली; मात्र एक माकड गावातच थांबले. हे माकड आक्रमक बनून घरांच्या किचनमध्ये शिरणे, अन्नसामग्रीची नासधूस करणे तसेच एकट्या व्यक्तींवर हल्ला करणे असे प्रकार करत होते. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून एका व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. वनविभागाचे गोळेगाव वनपाल अनिल साळुंखे, वेल्हाळे वनरक्षक प्रसाद कुलकर्णी तसेच संरक्षण मजूर यांच्या पथकाने पाचोरा येथून पाचारण करण्यात आलेल्या माकड पकडणाऱ्या तज्ज्ञांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारच्या सुमारास संबंधित माकडाला पकडण्यात यश आले.

यावेळी सरपंच लक्ष्मण पाटील, माजी सरपंच तुषार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले. माकडाला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंद करून सायंकाळी जंगलात सोडण्यात आले.माकड पकडण्यात यश आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वनविभागाच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add