Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

जळगाव

जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर;

जळगाव | गेल्या काही दिवसापासून जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी मनपाचे सूत्र हाती घेतल्यानंतर जळगाव शहराच्या हद्दीत असलेल्या छोट्या अतिक्रमण धारकांवर मोठी कारवाई सुरू झाली आहे.  मात्र शहरातील अनेक परिसरात रुग्णालय चालकांनी मोठे अतिक्रमण केले आहे यावर देखील कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करू लागले आहे.

जळगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौरपदी दीपमाला काळे व उपमहापौपदी मनोज चौधरी यांचे वर्णी लागली आहे त्यानंतर जळगाव महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग मोठ्या हिमतीने कामाला लागला असून अनेक ठिकाणी असलेले छोट्या-मोठ्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा पडत आहे.  मात्र शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या अनेक रुग्णालयाच्या बाहेर अतिक्रमण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुचाकी चारचाकी लावण्यास व्यवस्था नसते तर दुसरीकडे त्याच रुग्णालय चालकांनी पार्किंगच्या ठिकाणी आयसीयू विभाग तसेच मेडिकल बनवून घेतले आहे.

  त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आपली दुचाकी चारचाकी वाहने दुसऱ्याच्या रुग्णालयाबाहेर किंवा भर रस्त्यावर पार्किंग करून रुग्णालयात यावे लागते आहे. त्यामुळे सर्वसामान्य जळगावकर नागरिकांना त्या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत केली जात आहे. नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी ज्याप्रमाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली त्याच प्रकारे जळगाव शहरातील मोठ्या अनधिकृत अतिक्रमण धारकांची जर हजेरी घेतली तर महानगरपालिकेला दंडाच्या माध्यमातून मोठी रक्कम देखील मिळेल व महापौर दीपमाला काळे यांचे जळगावकर नागरिक कौतुक देखील करेल अशी कारवाईची अपेक्षा जळगावकर नागरिक करू लागला आहे.

अतिक्रमण विभाग व डॉक्टरांची चिरी-मिरीची चर्चा…

जळगाव महानगरपालिका अंतर्गत असलेले अनेक खाजगी रुग्णालय महानगरपालिकेचे सर्वच नियम धाब्यावर ठेवून आपला उद्योग मोठ्या ताकदीने करीत असतात या डॉक्टरांच्या ताकदीला महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ असल्याची चर्चा जळगाव शहरात सुरू झाली आहे. या अधिकारी व रुग्णालय चालकांमध्ये नेहमीच चिरीमिरी होत असल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळेच रुग्णालय चालक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून मोठे अतिक्रमण करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add