Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिव महापुराण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे १० ते १६ मार्च दरम्यान आयोजन !

ताज्या बातम्या

शिव महापुराण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे १० ते १६ मार्च दरम्यान आयोजन !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

दररोज तीन लाख भाविक येणार ; प्रशासनाकडून जय्यत तयारी

भुसावळ पाडळसे शिवार (ता. यावल) येथे १० ते १६ मार्च या कालावधीत पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होणार असून दररोज सुमारे तीन लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांसाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. शुक्रवारी भुसावळ प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी रेल्वे, पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तापी नदी सध्या काठोकाठ भरलेली असल्याने नदीकाठावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. पाण्यात दोन बोटी तैनात असतील. अकलूद शिवारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानव्यवस्था करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी १० घंटागाड्या व २५ ट्रॅक्टरची सोय करण्यात आली आहे.९ मार्च रोजी सकाळी तापी नदीच्या उत्तर भागापासून कथास्थळापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल. दुपारी ४ वाजता पंडित मिश्रा यांचे भुसावळात आगमन होईल. १० ते १५ मार्च दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा निरुपण होणार असून १६ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत समारोप होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता ते सिहोरकडे प्रस्थान करतील.

कथास्थळी ३०० बाय ६०० फूट आकाराचा भव्य जर्मन हँगर डोम उभारण्यात येत असून ४० बाय ८० फूट मुख्य व्यासपीठ उभारले जाणार आहे. संगीतकार व माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. भाविकांच्या सोयीसाठी १५ बाय १५ आकाराचे सुमारे २ हजार सिलिंग लावण्यात येणार आहेत.
दररोज लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सर्व विभागांनी सतर्क राहून भाविकांना सुरक्षित, सुकर व शिस्तबद्ध अनुभव देण्यासाठी नियोजन केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add