Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»बोहर्डी शिवारातील भारत गॅस गोडाऊन फोडून ५८ सिलिंडर चोरी

ताज्या बातम्या

बोहर्डी शिवारातील भारत गॅस गोडाऊन फोडून ५८ सिलिंडर चोरी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

वरणगाव प्रतिनिधी : शहराजवळील बोहर्डी शिवारातील लालमाती परिसरात असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या सिलिंडरांची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.


याप्रकरणी गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव आहिरे (वय 51, रा. शांतिनगर, भुसावळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची रोहंत गॅस एजन्सी ही भारत गॅस कंपनीची वितरक असून मुख्य कार्यालय मकरंद नगर, वरणगाव येथे आहे.
संबंधित गोडाऊनमध्ये जळगाव येथून आलेल्या भरलेल्या सिलिंडरांचा साठा ठेवला जातो.


फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गोडाऊनमध्ये १९५ सिलिंडर शिल्लक होते. गोडाऊन कीपरने दोन कुलपे लावून चाव्या मालकाकडे दिल्या होत्या. मात्र २६ फेब्रुवारी रोजी सकाळी गोडाऊनचे कुलूप तोडलेले आढळून आले. गोडाऊनच्या बाहेर पाच सिलिंडर पडलेले दिसून आले, तर ५८ सिलिंडर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.


विशेष म्हणजे, गोडाऊनमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरक्षारक्षक नव्हता तसेच सीसीटीव्ही कॅमेरे २१ फेब्रुवारीपासून बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी वरणगांव पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add