Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»महानगरपालिकेच्या ‘स्थायी’ आणि ‘महिला व बालकल्याण’ सभापती बिनविरोध

राजकारण

महानगरपालिकेच्या ‘स्थायी’ आणि ‘महिला व बालकल्याण’ सभापती बिनविरोध

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सिंधुताई कोल्हे यांच्याकडे महिला बालकल्याण,डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हाती स्थायी समितीचा कारभारी

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले.

​अर्ज दाखल करण्याच्या वेळी महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती आणि राजकीय वातावरण उत्साहाचे दिसून आले. यावेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालाणी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तर महिला बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे यांची उपस्थिती होती.

​शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, समिती सदस्य प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह नगरसेवक प्रवीण कोल्हे व पियुष कोल्हे यांनी उपस्थित राहून उमेदवारांना पाठबळ दिले. डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या रूपाने अभ्यासू नेतृत्व स्थायी समितीवर येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर अनुभवी सिंधुताई कोल्हे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीची सूत्रे गेल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीत नवा उत्साह संचारला आहे. विरोधी पक्षांकडून कोणताही अर्ज न आल्याने आता केवळ प्रशासकीय स्तरावर अधिकृत घोषणेची प्रतीक्षा उरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add