Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पाणंद रस्ते योजना’ ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

ताज्या बातम्या

पाणंद रस्ते योजना’ ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी,

जळगाव प्रतिनिधी | ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .

या प्रशिक्षणात शासन निर्णयातील विविध तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना; कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे लेखा अधिकारी उपस्थित होते.

या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव नितीन गणापुरे तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती मंजुषा घाटगे उपस्थित होत्या. हे प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी फैजपूर बबन काकडे यांनी दिले.

शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०२५ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवावी व योजना यशस्वी करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. तसेच यासंदर्भातील तांत्रिक प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्रीमती घाटगे यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add