Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पाळधी – जळगाव बायपासवर विचित्र अपघात; ट्रकची चार ते पाच वाहनांना धडक

जळगाव

पाळधी – जळगाव बायपासवर विचित्र अपघात; ट्रकची चार ते पाच वाहनांना धडक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली.

जळगाव । जळगाव–पाळधी बायपासवर विचित्र अपघात घडला. काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली असताना भरधाव ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. दोन्ही बाजूने अपघात झाल्याने बायपासवर तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्यामुळे काही वाहनधारकांनी कचरा डेपो पासून वाहने पुन्हा जुन्या महामार्गाकडे वळवून पर्यायी मार्गाचा वापर केला. परंतू अनेकांना मार्ग न सापडल्याने त्यांना रांगेत उभे राहून महामार्ग सुरळीत होण्याची वाट पहावी लागली. या वेळी पोलिसांनी एक क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने हटवित महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add