Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»विकास गोल्ड दुधाच्या दरात वाढ, 1 मार्चपासून नवे दर लागू

जळगाव

विकास गोल्ड दुधाच्या दरात वाढ, 1 मार्चपासून नवे दर लागू

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव । आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जळगावकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्च २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार असून, मात्र अर्धा लिटरच्या पाऊचला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे.

संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाच्या दरात प्रति लिटर तब्बल सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याउलट विक्री दरात अडीच महिन्यांपूर्वीच दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे खरेदी आणि विक्री दरातील सुमारे पाच रुपयांची तूट निर्माण झाली आहे.

ही तूट कमी करण्यासाठी आणि संघाचा आर्थिक समतोल राखण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे व्यवस्थापकीय यांनी स्पष्ट केले. दरवाढ १ मार्चपासून लागू होणार असून, त्यानंतर गोल्ड दूधाचे एक व पाच लिटर पाऊच प्रति लिटर एक रुपयांनी महाग मिळणार आहे. दरम्यान, अर्धा लिटर पाऊचच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add