Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»आ एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वाळू वाहतूक प्रश्न उपस्थित केला

ताज्या बातम्या

आ एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वाळू वाहतूक प्रश्न उपस्थित केला

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई : ९० हून अधिक वाहनाविरुद्ध गुन्हे दाखल !

जळगाव प्रतिनिधी – आ एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वाळू वाहतूक प्रश्न उपस्थित केला असता जळगाव पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७/०२/२०२६ रोजी पहाटे ०५.०० वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी ही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.जळगाव उपविभागांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली आहे . या मोहिमेत जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाहीचे नेतृत्व केले या मोहिमेमध्ये जळगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांभोरी, टाकरखेडे, खेडी व लगतच्या परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण ९० वाहनांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम २०७अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
  •  जळगाव तालुका पोलीस स्टेशनः ३२ ट्रॅक्टर आणि ०८ डंपर (एकूण ४० वाहने),
  • कासोदा पोलीस स्टेशनः १५ ट्रॅक्टर,
  • भडगाव पोलीस स्टेशनः १३ ट्रॅक्टर आणि ०१ डंपर,
  • एरंडोल पोलीस स्टेशनः ०४ ट्रॅक्टर आणि ०१ डंपर.
  • मेहुणबारे पोलीस स्टेशनः या ठिकाणी १५ ट्रैक्टर आणि ०१ वाळूने भरलेला ट्रैक्टर मिळून आला.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.अवैध वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून संबंधित कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत खालील बाबींची पडताळणी करण्यात

 या कारवाई त दस्तावेज पडताळणी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या वाहनांचा वाहतूक परवाना (Permit), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि चालकाचा परवाना (DL) यांची सखोल तांत्रिक पडताळणी करण्यात आली.ज्या वाहनांकडे विहित कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नव्हती किंवा ज्यांनी परवान्यातील अटींचे उल्लंघन करून अवैध वाहतूक केली, अशी वाहने कलम २०७मधील अधिकारांचा वापर करून जागेवरच जप्त करून कारवाई करण्यात आली आहेत.जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नैसर्गिक साधनसंपत्तीची अवैध चोरी करणाऱ्या घटकांविरुद्ध ही मोहीम यापुढेही निरंतर सुरू राहील, असा प्रशासकीय इशारा देण्यात आला आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add