Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»१ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली.

ताज्या बातम्या

१ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली.

Editorial DeskBy Editorial DeskMarch 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

जळगाव । गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. १ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. तथापि, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची (१४ किलो) किंमत अद्यापही बदललेली नाही.

संपूर्ण देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागच्या काही महिन्यापासून घरगुती गॅसच्या किमती जैसे थे आहेत. घरगुती गॅसच्या किंमती मुंबईत ८५२.५० रुपये आहेत. घरगुती गॅस हा १४.२ किलोचा असतो. दिल्लीत घरगुती गॅसच्या किंमती ८५३ रुपये आहेत. कोलकत्त्यात घरगुती गॅसच्या किंमती ८७९ रुपये आहेत. चेन्नईत घरगुती गॅसच्या किंमती ८६८.५० रुपये आहेत.

एलपीजी गॅसच्या किंमती या अनेक घटकावर अवलंबून असतात. हे दर आयपीपीद्वारे ठरवले जातात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमती, डॉलर रुपया आणि मालवाहतून याचसोबत कर यावर हे दर ठरवले जातात. कर आणि लॉजिस्टिकचा खर्च हा राज्यानुसार बदलतो. त्यामुळे एलपीजीच्या किंमतींमध्ये फरक पडतो.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add