Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरातील शनिपेठेतील गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

जळगाव

जळगाव शहरातील शनिपेठेतील गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Editorial DeskBy Editorial DeskMarch 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली.

जळगाव । शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. तक्रारीची दखल घेत शनिवारीच अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले.

जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बळीराम मंदिर आणि शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाडी लावून किंवा रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेत्यांमुळे जवळपास ७० टक्के रस्ता ब्लॉक होतो आणि वाहनचालकांना ये-जा करण्यास रस्ता राहत नाही. शनिवारी तर कहरच असतो, काही मुजोर विक्रेते अरेरावी देखील करतात. याबाबत आज नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता.

तक्रारीची दखल घेत नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “नवीन तयार केलेले रस्ते जर नागरिकांना वापरण्यास मिळत नसतील, तर अशा रस्त्यांचा उपयोग काय?” असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच अतिक्रमणमुळे नागरिकांना त्रास होता कामा नये असेही त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add