
आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती
MahaLive News | जळगाव : जळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या भिकामचंद जैन नगर व वाघुळदे नगर परिसरात रस्ता कॉंक्रेतीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, विकासाच्या दिशेने एक ठोस व महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.या विकासकामासाठी सागर जिजाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर कामास मंजुरी मिळाली, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कामाचे उद्घाटन जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
उद्घाटनप्रसंगी नवनियुक्त महापौर दिपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आलेले नगरसेवक कविता सागर पाटील, नरेंद्र आत्माराम पाटील, अमर जैन व मानसी भोईटे यांच्या संयुक्त प्रयत्नातून या विकासकामाला मूर्त स्वरूप मिळाले आहे.

नगरसेवक कविता सागर पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून रस्ता कॉंक्रेतीकरणाच्या कामाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांना गती दिल्याने “आपण निवडून दिलेले नगरसेवक आपल्या कामाची जोरदार पावती देत आहेत” असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक ८ मधील जनतेतून व्यक्त केला जात आहे.
दीर्घकाळापासून रस्त्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या कॉंक्रेतीकरणामुळे मोठा दिलासा मिळणार असून, सुरक्षित व सुकर वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक कविता सागर पाटील म्हणाल्या,“प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी मूलभूत सुविधा सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे. आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही प्रभागात सातत्याने विकासकामांची मालिका सुरू राहील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.या प्रसंगी परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


