Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने तुझ्या बापाला मारुन टाकेल तरूणीला धमकी देत अत्याचार!

जळगाव

वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने तुझ्या बापाला मारुन टाकेल तरूणीला धमकी देत अत्याचार!

Editorial DeskBy Editorial DeskMarch 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

जळगाव – वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७,  याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्यचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी संशयित दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी  गेला होता. त्याने पीडित मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेला तिच्यासह तिच्या वडीलांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आल्यानंतर पीडितेने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानुसार कुटुंबियांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७, याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि साजीद मन्सूरी हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add