Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले.

ताज्या बातम्या

होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले. पुण्यातील कोरेगाव पार्क–मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे आयोजित होळी सेलिब्रेशन कार्यक्रमादरम्यान लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त रॉयल फॉर्म येथे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी जमले होते. डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत सर्वजण नाचत असताना अचानक स्टेजजवळ उभारण्यात आलेला लाईटचा लोखंडी गर्डर कोसळला. हा गर्डर थेट नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. अपघातात सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांना गंभीर दुखापत झाल्याने ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.घटना घडताच कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकजण घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.लाईटचा गर्डर नेमका कशामुळे कोसळला, तो व्यवस्थित बसवण्यात आला होता का, सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आयोजकांकडूनही माहिती घेतली जात आहे. होळीच्या जल्लोषात घडलेल्या या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सार्वजनिक कार्यक्रमांतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

May 20, 2026

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add