Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगावमधील गोवंश तस्करीच्या संशयावरून मध्यरात्री थरार; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी!

ताज्या बातम्या

जळगावमधील गोवंश तस्करीच्या संशयावरून मध्यरात्री थरार; वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर पोलिसांना एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

जळगाव – शहरात गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनावरून बुधवारी (४ मार्च) पहाटे मोठा राडा झाला. जळगावमधील मास्टर कॉलनी परिसरात झालेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी झालेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर पोलिसांना एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

पोलिसांनी या वाहनाचा अमळनेरपासून जळगावपर्यंत फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग केला. हे वाहन पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात पोहोचले असता, स्थानिक काही तरुणांनी देखील पोलिसांच्या मदतीसाठी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयित वाहन मास्टर कॉलनी परिसरात शिरल्यानंतर परिस्थिती चिघळली.वाहन अडवल्यानंतर संतप्त जमावाकडून परिसरात दगडफेक करण्यात आली. यात एका कारसह दोन दुचाकींची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. दरम्यान, पहाटेच्या वेळी घटनास्थळी राहून गेलेल्या आपल्या दुचाकी घेण्यासाठी सकाळी गेलेल्या दोन तरुणांवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला.

या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती शहरात पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शहरात आणि संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

May 20, 2026

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add