Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शहरातील आशाबाबानगरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.

ताज्या बातम्या

शहरातील आशाबाबानगरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास!

जळगाव – शहरातील आशाबाबानगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका हॉटेल मॅनेजरच्या घरात शिरून सोन्याचे दागिने आणि घराबाहेर उभी केलेली दुचाकी, असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गोपाळ दिनकर चौधरी वय ५१ रा. आशाबाबा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हॉटेल मॅनेजर म्हणून ते नोकरीला आहे. ३ मार्च रोजी रात्री १२:३० ते पहाटे २ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात आरोपीने चौधरी यांच्या घरात कोणाचीही संमती न घेता प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंसह बाहेर उभी असलेली दुचाकी चोरून नेली.यावेळी चोरट्यांनपी ३५ हजाराचे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि (एमएच १९ बीवाय ११४५) क्रमांकाची दुचाकी असा एकुण ४५ हजारांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

May 20, 2026

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add