Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात जबरी चोरीच्या घटना

ताज्या बातम्या

वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात जबरी चोरीच्या घटना

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

लिफ्ट देतो म्हणत कारमध्ये बसवले आणि लुटले ! कारचालक पोलिंसाच्या जाळ्यात

जळगाव । जळगाव शहरात एकीकडे घरफोडी, वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान लिफ्ट देण्याच्या बहाणा करून एका ५२ वर्षीय व्यक्तीची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सलमान खान अमानउल्ला खान हे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अजिंठा चौफुली परिसरात रावेरला जाण्यासाठी उभे होते. त्यावेळी एका कारचालकाने १०० रुपये देण्याच्या मोबदल्यात रावेरला सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार खान हे कारमध्ये बसले.

मात्र काही अंतर गेल्यानंतर कारमधील इतर साथीदारांनी त्यांच्या हातांना पकडून ठेवले. दरम्यान, एकाने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील ९ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेत खाली उतरवून दिले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रीतम पार्क दरम्यान घडली.या घटनेनंतर १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारचालक शंभू सुभाष पाटील (रा. पिंप्राळा) याला अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

May 20, 2026

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add