Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात;

जळगाव

शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

कडधान्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव । हंगाम २०२५-२०२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यात तूर व हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तेलबिया व कडधान्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात तूर पिकासाठी दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय आधारभूत खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र तूरीचा सध्याचा बाजारभाव व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाफेड व एनसीसीएफ यांच्या विनंतीनुसार तूर नोंदणीसाठी दि. २४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार हरभरा (चना) खरेदीसाठी दि. १ मार्च ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत शेतकरी नोंदणी करण्यात येणार आहे. दि. १ मार्च २०२६ पासून पुढील ६० दिवस प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागात हंगाम २०२५-२०२६ मध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी एकूण ५६ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात ११, अहिल्यानगर जिल्ह्यात ३१, धुळे जिल्ह्यात २ तर जळगाव जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आपल्या जवळील मंजूर खरेदी केंद्रावर जाऊन शेतमालाची नोंदणी करावी व कमी दरात विक्री टाळून शासकीय आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उपसरव्यवस्थापक, विभागीय कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात खळबळ! लाचखोर उपनिबंधकासह खासगी पंटरला रंगेहात पकडले !

May 20, 2026

भुसावळात औषध दुकाने कडकडीत बंद; ई-फार्मसीच्या मनमानीविरोधात ‘केमिस्ट’ आक्रमक!

May 20, 2026

जळगावात पेटली ‘चूल’! महागाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर !

May 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add