Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले यांची भुसावळ येथे नियुक्ती

ताज्या बातम्या

पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले यांची भुसावळ येथे नियुक्ती

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 24, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ झाल्याने गुन्हेगारांचे बारा वाजणार…

भुसावळ प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर २०२५ भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली.राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश काढल्याने आता भुसावळ विभागातील गुन्हेगारांचे कायदेशीर रित्या बारा वाजणार असल्याने मोठी खळबळ उडाली.

कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीचे निर्देश दिले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगली माहिती आहे.

शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ विभागात कायदा सुव्यवस्थेला,जातीय सलोख्याला अधिक बळकटी मिळेल,असा विश्वास भुसावळ शहरासह परिसरात व्यक्त होत आहे.दरम्यान,सध्याचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची अपर पोलिस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीसह बदली होण्याची शक्यता आहे.त्यांच्या बदलीचे आदेश येत्या दोन दिवसांत जारी होणार असल्याची चर्चा आहे.

गावीत यांनी यंदा ३१ जुलै २०२५ रोजी भुसावळमध्ये पदभार स्वीकारला होता.त्यांच्या आधी कृष्णात पिंगळे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी विभागात बढतीसह बदली झाली होती.या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलात नवीन दबंग अधिकारी आल्याची चर्चा आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add