Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळ येथील विवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Editorial DeskBy Editorial DeskMarch 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ येथील एका विवाह सोहळ्यातून नववधूचे दागिने असलेली पर्स लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये फिर्यादी उज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. या वेळी नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते.

लग्नविधी सुरू असताना दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान सोफ्यावर ठेवलेली ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडीया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांचे एक पथक १९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मध्यप्रदेशात तळ ठोकून तपास करत होते. तपासादरम्यान आरोपी कृषी निरज बेडीया याने चोरीचे काही दागिने त्याचे नातेवाईक नरोत्तम सिसोदिया यांच्याकडे ठेवले असल्याची माहिती मिळाली. अखेर उपसरपंच संजय सिसोदिया यांच्या मध्यस्थीने हे दागिने पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.


या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दागिने फिर्यादींनी ओळखले असून पुढील तपासासाठी ते भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शरद बागल, रवी नरवाडे, अंमलदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक प्रमोद यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add