Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»आता LPG पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? तेल कंपनीच्या ‘त्या’ निर्णयानं खळबळ

ताज्या बातम्या

आता LPG पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? तेल कंपनीच्या ‘त्या’ निर्णयानं खळबळ

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव । मध्य पूर्वेतील इराण-इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाची झळ भारताला असत असल्याचं दिसत असून आजपासून भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्याने सर्वसामान्य नागरीक धास्तावले आहेत.

इराण-इस्त्रायलचे युद्धामुळे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळे इंधन,गॅसची आयात होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.अशातच आता तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल, असं तेल कंपन्यांनी सांगितले आहे.युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जळगावमध्ये पेट्रोल 105.47 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.28 रुपये प्रति लिटर आहे.

अगोदर आश्वासन नंतर घुमजाव

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी नागरिकांना पुरेशा प्रमाणात तेल आणि गॅस साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्या असल्या तरी भारतात तूर्तास दरवाढ होणार नाही असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले होते. पण एक रात्र उलटत नाही तोच केंद्र सरकारने घुमजाव केले.

आज सकाळीच घरगुती गॅसच्या किंमतीत 60 रुपयांची दरवाढवण्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. अर्थात ही दरवाढ तात्पुरती असल्याची सारवासारव आता करण्यात येत आहे. लवकरच इतर देशांकडून नैसर्गिक गॅस खरेदी होऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण पुरवठा साखळीवर सध्या मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आताही सरकार पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. पण गॅस दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. रशियाकडून भारताला पुढील 32 दिवस पेट्रोल-डिझेल खरेदी करता येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add