Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रवेश

राजकारण

बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रवेश

Editorial DeskBy Editorial DeskMarch 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

जळगाव प्रतिनिधी : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार महत्त्वाच्या संचालकांनी रविवारी नाशिक येथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. या प्रवेशामुळे बाजार समितीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजपचे आता स्पष्ट बहुमत झाले आहे.

या चार संचालकांच्या प्रवेशामुळे बाजार समितीमधील भाजपच्या संचालकांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील, तथा (लकी टेलर) माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी बाजार समितीचे विद्यमान सभापती सुनील महाजन देखील उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे जळगाव बाजार समितीवर आता भाजपची पकड मजबूत झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आता जळगाव ग्रामीण मध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add