Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»आर्थीक गैरव्यवहार झालेल्या काळात उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी मुलाच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले.

जळगाव

आर्थीक गैरव्यवहार झालेल्या काळात उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी मुलाच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 11, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपावरील आर्थीक गैरव्यवहार झालेल्या काळात उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी मुलाच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सोने देखील खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहाराचा पैसा संशयित वाल्मिक वाघ यांनी सोने किंवा अन्य कोणाच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे तपासधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस दलातील वेल्फेअरतर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मुलाने पोलिसांना एक चिठ्ठी आणून दिली. व्यवस्थापक वाघ बेपत्ता झाल्यानंतर पंपावरील दैनंदिन व्यवसहार संदर्भात ऑडीटच्या कामाला गती देण्यात आली. ऑडीटरच्या अहवालानुसार गेल्या तीन महिन्याच्या काळात पेट्रोल पंपाच्या व्यवहारात १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिनाभर पोलिसांना गुंगारा देणारे वाघ हे सोमवारी स्वःहून पोलीसांना शरण आले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती.

अपहार केलेल्या १ कोटी ३३ लाख रुपयांबाबत पीएसआय वाघ तपासात सहकार्य करीत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यात केवळ २५० रुपये शिल्लक आहेत. तसेच अपहारातील रक्केतून त्यांनी कोठे संपत्ती खरेदी केली आहे का? किंवा ती रक्कम कोठे गुंतविली अथवा ती कोणाच्या स्वाधीन केली? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करण्यासाठी संशयित वाल्मिक वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ या दोघ पिता-पुत्रांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वडीलांनी मुलाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, आणि ते मुलाने काढले त्यामुळे मुलाला या गुन्ह्यात गोवणे योग्य नाही. शेखर वाघ याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही सुरुवातीपासून तो पोलिसांच्या संपर्कात आहे. एका खासगी ऑडीटरच्या रिपोर्टवरुन हा गुन्हा दाखल झाला असून या अपहाराबाबत संशयित वाघ यांच्याकडून खुलासा मागविणे गरजेचे होते, मात्र तो न मागविता गुन्हा दाखल केल्याचे संशयिताचे वकील अॅड. अकील ईस्माईल यांनी न्यायालयासमोर सांगितले.

पसार होण्यापुर्वी वाल्मिक वाघ हे बेपत्ता होण्यापुर्वी ते दि. ८ फेब्रुवारी रोजी कुटुंबियांना भेटले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी दहा ग्रॅम सोने खरेदी करुन मुलाकडे दिले. दि. १० रोजी बेपत्ता झाल्यानंतर घरी सुसाईट नोट पाठवून त्यांनी वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याचे देखील नोटमध्ये लिहीले होते. त्यामुळे वडीलांनी केलेल्या अपहाराबद्दल त्यांच्या मुलाला माहिती होती, मात्र ती माहिती त्याने पोलिसांपासून लपविल्याचे तपासधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी न्यायालयासमोर सांगितले.

शरण आलेल्या उपनिरीक्षक वाघ यांच्याकडे अपहाराच्या रकमेबाबत चौकशी केली असता, त्यांनी कोट्यावधींचा नव्हे तर केवळ दहा ते पंधरा लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाघ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्याची तपासणी केली असता, त्यांच्या खात्यात काही किरकोळ रक्कम शिल्लक होती. तर अपहार झालेल्या काळात वाघ यांच्या खात्यातून त्यांच्या मुलाच्या खात्यामध्ये तब्बल दहा लाख रुपये ट्रान्सफर केले होते आणि त्यांच्या मुलाने ते बँकेतून काढल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add