Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस ; हजारो शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्याने खळबळ

ताज्या बातम्या

केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस ; हजारो शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्याने खळबळ

Editorial DeskBy Editorial DeskMarch 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे.

जळगाव । जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोठे फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात केळीची लागवड नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर केळी दाखवून पीक विमा मिळवण्याचा डाव रचला होता, मात्र प्रशासनाच्या सॅटेलाइट तपासणीत हा डाव उधळला. या प्रकरणी प्रशासनाने संशयित सर्व शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) मार्फत सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या पडताळणीत हा प्रकार उघड झाला. जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान ‘एमआरसॅक’ द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी विभागाला प्राप्त अहवालानुसार, प्रत्यक्षात २८,४७५ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नव्हती. तरीही २७,४१९ शेतकऱ्यांनी त्या जागी लागवड असल्याचे दाखवून पीक विमा काढल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर १७ हजार हेक्टर क्षेत्रावर चार ते पाच शेतकऱ्यांनी एकाच शेतजमिनीवर विमा काढल्याचा संशय आहे, ज्यात २९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. याप्रमाणे, केळी विम्यातून अंदाजे २५० कोटी रुपयांचा फसवणुकीचा डाव फसला आहे.

शेतकऱ्यांना अल्टिमेटम

केळी लागवड नसताना बोगस विमा काढणाऱ्या २७ हजार व दुसऱ्याचा शेतात विमा काढणाऱ्या २९ हजार, अशा ५५ हजार शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ७ दिवसांच्या आत तालुका कृषी कार्यालयात समाधानकारक खुलासा न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

या गैरप्रकारात काही सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ४८ सीएससी केंद्रांवरून बोगस फॉर्म भरून देण्यात आल्याचा आरोप असून, या केंद्रचालकांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

हा तालुका अव्वल क्रमांकावर

जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार प्रकर्षाने समोर आला असून यात चोपडा तालुका अव्वल क्रमांकावर असून, येथील तब्बल ७ हजार २४३ शेतकऱ्यांनी शेतात केळी नसतानाही विमा काढल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी ८ हजार ४१९ हेक्टरवर केळी नसताना केळी दाखवली आहे. त्याखालोखाल यावल तालुक्यात ५ हजार ३६८ शेतकऱ्यांनी तर रावेर, जळगाव, धरणगाव, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर संशयास्पद प्रकरणे आढळून आली आहेत. दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटिसा देऊन स्पष्टीकरण मागवले असून, योग्य कागदपत्रे सादर न केल्यास विमा रद्द करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add