Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»आरोग्य कर्मचाऱ्यांना गैरप्रकार खपवून घेणार नाही उपमहापौरांचा इशारा

जळगाव

आरोग्य कर्मचाऱ्यांना गैरप्रकार खपवून घेणार नाही उपमहापौरांचा इशारा

Editorial DeskBy Editorial DeskMarch 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या.

जळगाव- उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य आरोग्य निरिक्षक, युनिट प्रमुख, स्वच्छता निरिक्षक इत्यादी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामात सुधारणा करण्याचे तसेच कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या. 17 वा माळा येथील उपमहापौर दालनात ही सभा आयोजित करण्यात आलेली होती.

जळगाव शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. शहराच्या सर्व भागात घंटागाडी नियमित फिरली पाहीजे, रस्ते गटारी यांच्या नियमित स्वच्छतेसह, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली कर्मचाऱ्यांकडून नेमलेली कामे करुन घ्यावी, काम न करणाऱ्या वा सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नये. हजेरी मुकादम यांनी न घेता ती स्वच्छता निरिक्षक यांनी घ्यावी, कामगारांची बोगस हजेरी लागणार नाही, मक्तेदाराकडून अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना उपमहापौरांनी सभेत दिल्या.

स्वच्छता कामकाजात नियमभंग, चुकीची हजेरी, खोटी माहिती किंवा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे अशा प्रकारची बाब आढळल्यास कडक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही उपमहापौर यांनी सभेत दिला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add