Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकाने कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

ताज्या बातम्या

पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकाने कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

वरणगाव येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक

वरणगांव प्रतिनिधी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकाने कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करून एका आरोपीस ताब्यात घेतल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे .पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील तसेच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चौधरी, छगन तायडे व रतन गिते यांनी वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई केली.


या कारवाईदरम्यान आरोपी संजय गोपाल चंदेले (वय 50, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, वरणगाव ता. भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 25,000 रुपये किंमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी कट्टा व 2,000 रुपये किंमतीचे दोन पितळी जिवंत राऊंड असा एकूण 27,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीस मुद्देमालासह वरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add