
यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
यावल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार,गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत यावल तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, विजयकुमार ढगे.महसूल उपजिल्हाधिकारी,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :जिवंत सातबारा वाटप : एकूण वारस नोंदी 112 प्रातिनिधिक स्वरुपात वाटप 07 उत्पन दाखले वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09 शिधापत्रिका वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09,जात प्रमाणपत्र वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 11,तुकडा शेरा कमी करणे सातबारा उतारा व आदेश वाटप एकूण तुकडा असलेले सातबारा : 914, तुकडा कमी करणे पात्र : 456 प्रातिनिधिक स्वरुपात 11
अधिवास प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 08,विशेष अर्थसाहाय योजना प्रातिनिधिक स्वरुपात 21,
लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप 13,आदिवासी खातेदार नोंद 2,अकृषिक सातबारा शेतसारा माफी 22, पुनर्वसन शेरा कमी करणे 8,
घरकुल लाभ 25,आयुष्यमान कार्ड – 11- आरोग्य विभाग बेबी किट 2,१) ट्रक्टर-4 शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.एकूण 900–950 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव , श्रीमती मोहनमाला नाझीरकर, तहसिलदार यावल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


