Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली.

जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून एक मोठी दुर्घटना घडली. येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधीतील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येत असून गेल्या काही महिन्यांपासून येथे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, कामगार नियमितप्रमाणे काम करत असताना अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब (साचा) कोसळला आणि क्षणातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागचे नेमके कारण काय, बांधकाम प्रक्रियेत निष्काळजीपणा झाला का, याचा सखोल तपास करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यात सहभाग घेतला. त्यांनी जखमी कामगारांची विचारपूस करत त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

युद्धामुळे गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 वरून 25 दिवसांवर

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add