Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»ट्रॅक्टर उलथून भीषण अपघात; चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

ट्रॅक्टर उलथून भीषण अपघात; चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Editorial DeskBy Editorial DeskDecember 25, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

किन्ही गावाजवळ हृदयद्रावक घटना; एक मजूर गंभीर जखमी

वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर परिसरात राहणाऱ्या एका मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. खडी-कच आणण्यासाठी जात असताना किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलथल्याने बाप आणि चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिध्देश्वर नगर येथील रहिवासी आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे संजय श्रावण साबळे (वय ४८) हे सकाळच्या सुमारास अक्षय संतोष मोरे (वय २७) यांच्यासह ट्रॅक्टरने खडी-कच घेण्यासाठी तालुक्यातील किन्ही गावाकडे निघाले होते. यावेळी संजय साबळे यांनी आपला सात वर्षांचा मुलगा भुषण संजय साबळे यालाही सोबत घेतले होते.


किन्ही गावाच्या हद्दीपासून काही अंतरावर असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटून तो अचानक रस्त्याच्या कडेला उलथला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने संजय साबळे आणि त्यांचा मुलगा भुषण यांचा जागीच करूण अंत झाला. अपघातात अक्षय मोरे गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सिध्देश्वर नगर परिसरात शोककळा पसरली असून, साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add