
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा – तालुक्यातील वैजापुर ते चोपडा जाणारे रोडवर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला यांचे शेताजवळ इम्रान रहेमान पठाण (वय २१, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जि. जालना), रहेमान निहामत पठाण (वय ५९, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जि. जालना, अतिक रफिक शेख (वय ४५, रा. सातोना खुर्द, ता. परतूर, जि. जालना) यांना गांजाची तस्करी करतांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून २ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १३ किलो २५४ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश टाक करत आहे.


