Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»टेक्सटाईल पार्कची मंजुरी भुसावळला प्रकल्प गेला जामनेरला : संजय सावकारेंची खंत

राजकारण

टेक्सटाईल पार्कची मंजुरी भुसावळला प्रकल्प गेला जामनेरला : संजय सावकारेंची खंत

Editorial DeskBy Editorial DeskMarch 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले.

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांचा अभाव ही दीर्घकालीन समस्या ठरत असताना, भुसावळ येथे प्रस्तावित असलेला टेक्सटाईल पार्क नंतरच्या काळात जामनेर येथे हलविण्यात आल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खंत व्यक्त केली. मात्र, टेक्सटाईल पार्क कुठे का होईना जिल्ह्यातच होत आहे, याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पात राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध घटकांच्या कल्याणाकरीता केलेल्या आर्थिक तरतुदींची माहिती देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असले, तरी त्यावर आधारित सूतगिरण्यांसह वस्त्रनिर्मिती प्रकल्प, प्रक्रिया उद्योग यांची अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी, कच्चा माल बाहेरच्या जिल्ह्यांत किंवा राज्यांत पाठवावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारा फायदा मर्यादित राहतो. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. रेल्वे व दळणवळणाच्या सोयी, भौगोलिक मध्यवर्ती स्थान आणि औद्योगिक विस्ताराची क्षमता यामुळे भुसावळ हा प्रकल्पासाठी योग्य पर्याय ठरणार होता. मात्र, काही प्रशासकीय व स्थानिक कारणांमुळे हा प्रकल्प नंतर जामनेर येथे वळविण्यात आला.

भुसावळसाठी मंजूर झालेला टेक्सटाईल पार्क जामनेरला गेला, ही खंत नक्कीच आहे. भुसावळमध्ये हा प्रकल्प झाला असता, तर त्या भागाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली असती. मात्र, प्रकल्प जिल्ह्याबाहेर न जाता जळगाव जिल्ह्यातच साकारत आहे, ही देखील समाधानाची बाब आहे, असे देखील मंत्री सावकारे म्हणाले. टेक्सटाईल पार्कमुळे कापसावर आधारित मूल्यवर्धित उद्योग उभे राहतील.

जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, वीव्हिंग ते रेडीमेड वस्त्र निर्मितीपर्यंतची संपूर्ण साखळी एकाच ठिकाणी विकसित होऊ शकते. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि स्थानिक शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्यास मदत होईल. तसेच, या प्रकल्पामुळे युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. जळगाव जिल्ह्यात वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री सावकारे यांनी स्पष्ट केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add