Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»बहुजनांचा ओबीसी जनगणनणेसाठीजिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा

जळगाव

बहुजनांचा ओबीसी जनगणनणेसाठीजिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा

Editorial DeskBy Editorial DeskMarch 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा

जळगाव प्रतिनिधी : शहरात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्यावतीने निघालेला मोर्चा सोमवार, २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. हा मोर्चा शहरातील जी.एस.ग्राऊंड येथुन दु. १२ वाजता भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध सामाजिक,धार्मिक संघटना व राजकीय पक्ष मोर्चात सहभागी झाले होते. ओबीसींची जनगणना,युजीसी कायदा व शिक्षक पात्रता परिक्षेच्या मुद्द्यांवर विविध मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा
या मोर्चात विविध सामाजिक संघटनांसह राजकुमार गवळे,राष्ट्रीय सचिव सेन संघटना, तसेच राष्ट्रीय पिछडा आेबीसी वर्ग मोर्चाचे रिंकी यादव,डॉ.एम.व्ही.भारंबे, वसंत कोलते, सतिश चौधरी, डॉ.सुभाष राणे, लेवा पाटीदार महासंघ,सुमित्र अहिरे, डी.एम.भालेराव, दिलीप जाधव, दिलीप इंगळे, देविदास पारधे, रमेश थाटे, बहुजन क्रांती मोर्चा,खुमानसिंग बारेला,गफुर तडवी,अफजल तडवी,गेमा बारेला(राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,भगवान कांबळे,संजय कदम(राष्ट्रीय मुलनिवासी असंघटित कामगार संघटना),फारुखभाई शेख–जिल्हाध्यक्ष मनियार बिरादरी,डॉ.शाकीर शेख, राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,गोकुळ राठोड,अभयसिंग राठोड,योगेश राठोड,नवलसिंग राठोड, पृथ्वीराज राठोड(राष्ट्रीय घुमंतु जनजाती मोर्चा),सुभाष इंगळे,प्रा.रामभाऊ सोनवणे,आर.बी.परदेशी, रविंद्र मोरे, प्रकाश तिडके,सुनिल सोनवणे,सुभाष साळुंखे, मधुकर अहिरे,कैलास म्हसाने,रमेश थाटे,लंकापती भालेराव,ज्ञानदेव भालेराव,संदीप तायडे,भगवान सोनवणे,राजेंद्र सोनवणे,जय मोरे, संध्या तायडे,कमल ढिवरे,चारुलता पाटील,साधना लोखंडे,कविता पवार,सिंधु जाधव,प्रद्युम्न वारडे,जगदीश सपकाळे,विलास सोनवणे उपसरपंच,कानळदा व ममुराबाद, जे.के.पाटील, एस.एल.चौधरी, विक्रम सोनवणे,जे.पी.सपकाळे,महेश पाटील,समाधान जाधव,कल्पेश चौधरी, गजानन माळी,पंडीत माळी,रविंद्र वाडे,योगेश भोईटे, नितीन पाटील,सर्वेश चौधरी,संदीप डोलारे,संभाजी अस्वार आदींसह पदाधिकारी या मोर्चात सहभागी होते.


निवेदन देतेवेळी विनोद अडकमोल, सुनिल देहडे, खुशाल सोनवणे,माया खंडारे, संगिता देहडे (बहुजन मुक्ती पार्टी), गौरव सुरवाडे (लोक जनशक्ती पार्टी) यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी श्रीमती चव्हाण यांना निवेदन देवून मोर्चाची सा़ंगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add