Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगरच्या येथील गौरव भंडारे यांची GATE परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरच्या येथील गौरव भंडारे यांची GATE परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

Editorial DeskBy Editorial DeskMarch 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे.

मुक्ताईनगर प्रतिनिधी : येथील गौरव गोपाल भंडारे यांनी राष्ट्रीय स्तरावरील GATE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अखिल भारतीय स्तरावर 4053 वा क्रमांक पटकावला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.


गौरव यांचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. आईनेही वडिलांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. अशा बिकट परिस्थितीतही गौरव यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांच्या कष्टाचे चीज झाले आहे.


सध्या गौरव हे शिरपूर येथील एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. GATE परीक्षेतील यशामुळे त्यांच्यासाठी देशातील नामांकित IIT आणि NIT संस्थांमध्ये M.Tech शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.


गौरव यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा असून, नर्सरीपासून बारावीपर्यंत श्री. मासुळे सर यांचे मार्गदर्शन तसेच सध्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आहे.गौरव यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर परिसरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add