Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»खंडाळे गावातील महिला वीज कर्मचारी यांना अश्लील शिवीगाळ , गुन्हा दाखल.

ताज्या बातम्या

खंडाळे गावातील महिला वीज कर्मचारी यांना अश्लील शिवीगाळ , गुन्हा दाखल.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना वीज बिलाबद्दल विचारणा केल्यामुळे सदर ग्राहकाने सर्वांच्या समोर शिवीगाळ केली

भुसावळ प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदी महावितरण कार्यालयातील कर्मचारी ज्योती शिंपी खंडाळे गावामध्ये एकट्या वीज बिल वसुली करत असताना गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना वीज बिलाबद्दल विचारणा केल्यामुळे सदर ग्राहकाने सर्वांच्या समोर शिवीगाळ केली , सदर माहिती त्यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना दिली , सदर घटनेची माहिती तात्काळ विभागातील सर्व कर्मचारी यांच्या पर्यंत गेल्यावर सदर घटनेबद्दल प्रचंड असंतोष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला.

सध्या मार्च महिना असल्यामुळे सर्व महिला व पुरुष कर्मचारी वसुलीसाठी ग्राहकांकडे जाऊन बिल भरण्यासाठी विनंती करत आहे परंतु समाजातील काही घटकांमुळे कर्मचारी यांना काम करताना अशा घटनेचा सामना करावा लागत आहे ज्योती शिंपी यांनी भुसावळ ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल विसपुते व तडवी करत आहे .

सदर तक्रार दाखल करताना भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता महाजन , शिंदी शाखेचे अभियंता आखरे व सर्व सहकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते , आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व संघटना पदाधिकारी यांनी पोलिस निरीक्षक गायकवाड साहेब यांची भेट घेऊन केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add