Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव

आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

Editorial DeskBy Editorial DeskMarch 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शहरातील सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ

जळगाव : शहरातील सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असलेल्या आदर्श महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ दि. २४ मार्च २०२६ रोजी महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला.

या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षपदी अश्विनी मुंदडा यांची निवड करण्यात आली. त्या सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मा. केदारनाथ मुंदडा यांच्या सुन असून, त्यांच्या परिवाराची सामाजिक कार्यातील परंपरा लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

कार्यक्रमास मंडळाच्या संस्थापिका शीतलजी मंत्री, प्रमुख अतिथी केदारनाथजी मुंदडा तसेच शहरातील विविध महिला मंडळांच्या अध्यक्षा व सचिव यांची विशेष उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा पार पडला.

नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष – अश्विनी मुंदडा

सचिव – सोनाली काबरा

उपाध्यक्ष – सुनंदा लाठी

कोषाध्यक्ष – मनीषा मणियार

पीआरओ – लीना काबरा

सल्लागार – आरती काबरा

कार्यकारिणी सदस्य म्हणून नेहा लाठी, सारिका कोगटा, पूनम मंत्री, मधु तापडिया, राणी लाहोटी, वैशाली मुंदडा, विमला करनानी, शर्मिला न्याती, सपना काबरा, नम्रता काबरा, सुलभा छापरवाल, स्मिता सोमाणी, दीप्ती झंवर व नीलिमा धुप्पड यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्पना काबरा व सुचिता सोनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूनम मंत्री यांनी मानले. “मोर” थीमवर आधारित सजावट हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. स्वागत गीतावर भक्ती मुंदडा यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add