Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; एक जण ताब्यात

ताज्या बातम्या

चाळीसगाव तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; एक जण ताब्यात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले.

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जुनोने येथील कुंडाच्या नाल्यात रूखमाबाई रतन मोरे यांच्या शेताजवळ एका इसमाकडून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत दगडू सदाशिव गायकवाड (वय 50, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यास जागीच पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून सुमारे 350 लिटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, एरंडी मिश्रित) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 12,250 रुपये आहे.पोलिसांनी नमुना म्हणून रसायन सीलबंद करून घेतले असून उर्वरित रसायन व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(फ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण वरिष्ठठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण संगिले व अकराम बेग तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add