Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू कंटेनरच्या धडकेनंतर खाजगी बसला भीषण आग;

ताज्या बातम्या

17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू कंटेनरच्या धडकेनंतर खाजगी बसला भीषण आग;

Editorial DeskBy Editorial DeskDecember 25, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भयंकर ! कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी

कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे.. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एक भीषण बस अपघात झाला. बेंगळुरूहून गोकर्णला जाणारी खाजगी एसी स्लीपर बस कंटेनर लॉरीशी धडकली आणि त्यात आग लागली.या अपघातामध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत.

खासगी बस बंगळुरूहून गोकर्णाला निघाली होती. त्याचवेळी एक कंटेनर बंगळुरूकडे निघाला होता. हिरियुर येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटला अन् डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की बसचा चक्काचूर झाला अन् आग लागली.

खासगी स्लीपर बसमध्ये आगीचा तांडव उडाला. कंटेनर खासगी बसच्या मधोमध जोरात धडकल्याने आग लागली, त्यात अनेकजण अडकले. यामध्ये १७ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झाला.पहाटेची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेतच होते. एका क्षणात बसमध्ये सगळीकडे आग पसरली. आरडाओरड आणि किंचाळ्याने परिसर हादरला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अन् अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळावर पोहचल्या. तात्काळ बचावकार्य सुरू झाले. २२ जणांना वाचवण्यात यश आले.

ते सर्वजण जखमी आहेत, त्यांच्यावर हिरियुर आणि चित्रदुर्गातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या कंटेनर चालकाची चूक असल्याचे दिसतेय.हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add