Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»ब्रेक फेल झाल्याने गौताळा घाटात भीषण अपघातआयशर १०० फूट दरीत; ७ गंभीर, ६ जखमी !

ताज्या बातम्या

ब्रेक फेल झाल्याने गौताळा घाटात भीषण अपघातआयशर १०० फूट दरीत; ७ गंभीर, ६ जखमी !

Editorial DeskBy Editorial DeskMarch 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला.

चाळीसगाव – जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर बारामतीहून दस्तापूर (ता. सोयगाव) गावाकडे परतत असताना आयशर वाहनाचा ब्रेक फेल होऊन वाहन १०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दस्तापूर येथील मजूर बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. कामाचा पट्टा संपल्याने ते (एमएच २१ बीएच ०४४२) या आयशरने गावाकडे परतत होते. गौताळा अभयारण्यातील कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाटात वाहन पोहोचताच अचानक ब्रेक फेल झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले आणि त्यानंतर दोन ते तीन पलट्या खात दरीत कोसळले.


या अपघातात चालकासह एकूण १३ जण जखमी झाले. त्यापैकी वंदना अशोक अंभोरे (२५), रुकसाना सलीम तडवी (१७), दिव्या हिरामण पगारे (१७), सोनीबाई सलीम तडवी (३०), रंजनाबाई हिरामण पगारे (३०), मनीषा प्रवीण वाघ (२५) व ममता प्रवीण वाघ (१ वर्ष) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर चालक महेश अंदुरे (३३, रा. खेड, पुणे), अशा सुखदेव पगारे (४५), कोमल हिरालाल पगारे (८), ऋतिक प्रवीण वाघ (४), प्रवीण बापू वाघ (३०) व सलीम जमाल तडवी (३५, सर्व रा. दस्तापूर) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी दोरखंड व चादरीच्या साहाय्याने जखमींना दरीतून बाहेर काढले.दरम्यान, अपघातावेळी ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच काहींना उडी मारण्यास सांगितल्याने काहींचे प्राण वाचल्याची माहिती जखमींनी दिली. तब्बल ३५० किमीचा प्रवास करून गावापासून अवघ्या १३ किमी अंतरावर असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add