Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»महार वतन जमीन बनावट प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी –अनिल अडकमोल

ताज्या बातम्या

महार वतन जमीन बनावट प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी –अनिल अडकमोल

Editorial DeskBy Editorial DeskApril 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषदेत केली.

मानपुर येथील महार वतन जमिनीच्या बनावट व्यवहार प्रकरणाला नवे वळण लागले असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी,आणि आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषदेत केली.


दि. 31 मार्च 2026 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मानपुर ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील रहिवासी चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या मालकीची महार वतन जमीन 2002 साली खरेदी करण्यात आली होती. मात्र ही जमीन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुली शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणात अद्याप कोणतेही कारखाना उभारणीचे काम झाले नसून मूळ मालकांना जमीन परत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच बोडवड पोलीस स्टेशन येथे खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अडकमोल यांनी केली.


या प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या मुलीच्या नावावर अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच 2002 साली संबंधित व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राज्य विधानसभेतही या विषयावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सदर जमीन महार वतन असल्याचे स्पष्ट केल्याचेही अडकमोल यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला तक्रारदार चमेलीबाई तायडे यांच्यासह अशोक तायडे, संतोष तायडे, उत्तम तायडे, सौरभ तायडे आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add