Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगरच्या पंपावरील धक्कादायक प्रकार पेट्रोलसाठी चक्क 500 लिटरची टाकी आणली

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरच्या पंपावरील धक्कादायक प्रकार पेट्रोलसाठी चक्क 500 लिटरची टाकी आणली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

जळगाव । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणुकीचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक इंधन भरण्यासाठी रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती इंधनाची साठवणूक करून भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन भरण्यास परवानगी देणे नियमबाह्य असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add