Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»“श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक संदेश! जळगाव ते शिरसाळा पदयात्रा यशस्वीरीत्या संपन्न”

ताज्या बातम्या

“श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक संदेश! जळगाव ते शिरसाळा पदयात्रा यशस्वीरीत्या संपन्न”

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पहाटे ३ वाजता श्री सिद्धेश्वर हनुमानाचे दर्शन; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : जय भद्रा बहुउद्देशीय संस्था (पैलवान हुप ग्रुप) यांच्या वतीने आयोजित जळगाव ते श्री सिद्धेश्वर हनुमान शिरसाळा पदयात्रा आज पहाटे ३ वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाली. संपूर्ण पदयात्रा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

चैत्र शुद्ध १३, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी जळगाव येथून प्रारंभ झालेली ही पदयात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत अखेर श्री क्षेत्र शिरसाळा येथे पोहोचली. यात्रेदरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

ही पदयात्रा केवळ धार्मिक उपक्रम न राहता सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी ठरली. यावर्षी ऊर्जा व इंधन बचतीबाबत जनजागृती, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व तसेच रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ मदत करण्याबाबत संदेश देण्यात आला.
यात्रेदरम्यान स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन करत भाविकांची सोय, सुरक्षितता व शिस्त याची विशेष काळजी घेतली. त्यामुळे संपूर्ण पदयात्रा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली.

दरम्यान, नगरसेवक निलेश तायडे (नीलू आबा) यांनी स्वतः श्री क्षेत्र शिरसाळा येथे भेट देत पदयात्रेतील सर्व भाविकांची विचारपूस केली व त्यांच्या व्यवस्थेची पाहणी करत आयोजकांचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी नाताभाऊ सोनवणे मित्र परिवार तसेच इंजि. सागर शामकांत सोनवणे (नगरसेवक, मनपा जळगाव) यांचे सहकार्य लाभले. तसेच आयोजकांमध्ये योगेश गालफाडे यांच्यासह सागर भाऊ पैलवान व निखिल भाऊ पाटील यांचे विशेष योगदान राहिले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add