
मदरसा नूरुल इस्लाम येथे साधेपणात निकाह; साखरपुड्यातच उरकला विवाह सोहळा
चाळीसगाव प्रतिनिधी : शहरातील मदरसा नूरुल इस्लाम येथे दिनांक ४ एप्रिल रोजी पार पडलेल्या साखरपुडा कार्यक्रमातच निकाह विधी पूर्ण करून एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर चर्चेतून साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला.
या सोहळ्यात अकदस अफरोज खान (कालू खान) व मुब्बशिरा शेख (मुश्ताक शेख गफ्फार यांची कन्या) यांचा निकाह संपन्न झाला. धार्मिक विधी हाफिज जावेद साहेब इशाती (इमाम, मस्जिद अबू हनीफा) व हाफिज अब्दुल अजीज साहेब (इमाम, मक्का मस्जिद) यांच्या उपस्थितीत पार पडले.विशेष म्हणजे, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच शरबत देऊन विवाह सोहळा उरकण्यात आला, ज्यामुळे हा आदर्श विवाह म्हणून उपस्थितांनी कौतुक केले.


